Share

T20 World Cup | इंग्लंडला मोठा धक्का, हारिस रौउफने केला ‘हा’ गडी बाद

Published On: 

🕒 1 min read

मेलबर्न : आज मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऐतिहासिक टी 20 विश्वचषक (T20 World Cup) सामना होत आहे. यामध्ये इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakisthan) संघ आपसात भिडले आहे. समण्यापूर्वी नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजाचे कंबरच मोडले आहे. टी 20 विश्वचषक सामन्याच्या अंतिम फेरीमध्ये इंग्लंडच्या सॅम करनने 4 षटकांमध्ये फक्त 12 धावा देत पाकिस्तानचे 3 फलंदाज पॅवेलियनमध्ये वापस पाठवले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडच्या आदिल राशीदने पाकिस्तानचा हुकुमी एक्का म्हणजेच कर्णधार बाबर आझम याला बाद करत या सामन्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. राशीदने 12 धावा देत 2 विकेट काढल्या. तर दुसरीकडे क्रिस जॉर्डननेही 2 विकेट घेत या सामन्यांमध्ये आपला हातभार लावला. दरम्यान, पाकिस्तान संघ 20 षटकांमध्ये 8 बाद 137 धावांपर्यंत पोहोचू शकला. यामध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने 32 धावा केल्या तर शान मसुदने सर्वाधिक 38 धावा केल्या.

टी 20 विश्वचषक (T20 World Cup) अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडला मोठा धक्का

दरम्यान, इंग्लंड संघाची फलंदाजी सुरू असताना पाकिस्तान संघाकडून आक्रमक गोलंदाजी होताना दिसत आहे. पाकिस्तान संघातील हारिस रौउफने इंग्लंड संघातील हुकमी एक्याला म्हणजेच जॉस बटलरला 26 धावांवर बाद केले आहे. बटलरने 17 चेंडू मध्ये 26 धावा करत इंग्लंडला 5 शतकांमध्ये 43 धावांपर्यंत पोहोचवले.

138 धावांचे लक्ष डोळ्यासमोर घेऊन मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाला पाकिस्तान संघाने पावर प्ले च्या सुरुवातीलाच 2 धक्के दिले. यामध्ये शाईन आफ्रिदीने ॲलेक्स हिल्सला बाद केले. तर, चौथ्या षटकामध्ये हारिस रौउफने फिलिप्सल्टला 10 धावांवर बाद केले.

सॅम करण आणि ख्रिस जॉर्डनने पाकिस्तानचा निम्मा संघ बाद झाल्यावर उर्वरित संघाला देखील एकापाठोपाठ एक पॅवेलियनचा रस्ता दाखवला. यामध्ये सॅम करणे चार षटकांमध्ये 12 धावा देत 3 विकेट घेतल्या तर ख्रिस जॉर्डनने 2 आणि आदीलने 3 विकेट घेतल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!