Share

ENG vs IND : इंग्लंडच्या लाजिरवाण्या पराभवानंतर वसीम जाफरनं मायकल वॉनला डिवचलं; म्हणाला…

Published On: 

मुंबई : बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात (ENG vs IND) भारतीय संघाविरुद्ध इंग्लंडला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडचा हा पराभव मोठा असून आता त्यांनी मालिकाही गमावली आहे. यजमानांच्या पराभवानंतर भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनची खिल्ली उडवली आहे. त्याने ट्वीट करून मायकल वॉनला एक प्रतिक्रिया दिली आहे.

भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ४९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. आता या मालिकेत आणखी एक सामना शिल्लक आहे. प्रथम खेळताना टीम इंडियाने ८ गड्यांच्या मोबदल्यात १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडचा संघ १७ षटकांत १२१ धावा करून बाद झाला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाच्या या विजयाचे हिरो होते वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह.

या विजयानंतर वसीम जाफरने मायकल वॉनसाठी एक खास ट्वीट शेअर केले. त्याने लिहिले ‘आशा आहे की तू ठीक आहेस मायकेल वॉन.’ वसीम जाफरच्या ट्विटवर मायकल वॉनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि तो त्याला कसा प्रतिसाद देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सोशल मीडियावर वसीम जाफर आणि मायकल वॉन यांच्यात अनेकदा वाद होत असतात. यापूर्वी जेव्हा बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर मायकल वॉननेही असेच काहीसे ट्वीट केले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!