Share

Tanaji Sawant : शिवसेनेचा तानाजी सावंतांना मोठा धक्का, सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून हकालपट्टी

Published On: 

मुंबई : अनेक राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर स्थानापन्न झाले आहेत. यंदाचा महापूजेचा मान कुणाला मिळणार, यावर अनेक चर्चा रंगत होत्या. अखेर तो मान नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच प्राप्त झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. तसेच सध्या शिवसेनेला धक्यांवर धक्के बसत आहेत. मात्र यानंतर शिवसेनेने बंडखोरांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. शिवसेना पक्षातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्याबाबत शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेकडून तानाजी सावंत यांची शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती आहे. सोलापूर जिल्हा संपर्क पदावर अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचं वृत्त शिवसेनेचे मुख्यपत्र दैनिक ‘सामना’मध्ये देण्यात आलंय. तानाजी सावंत यांची हकालपट्टी आणि अनिल कोकीळ यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं करण्यात आल्याची देखील माहिती या वृत्तात देण्यात आली आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांना शिवसेनेचा हा मोठा धक्का मानला जातोय.

दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गटाचं प्रकरण आता न्यायालयात पोहचले आहे. दोन्ही बाजूंकडून न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. शिवसेनेने केलेल्या याचिकेवर दोन दिवसात सुनावणी होणार आहे. असे असतानाच विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे या आमदारांना 7 दिवसांमध्ये उत्तर द्यावे लागणार आहे. यावेळी शिवसेना कोणाची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची हा सवाल उपस्थित झाल्याने नोटीस बजावलेल्या आमदारांना 17 जुलैपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!