Share

Amit Shah : मुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्लीवारीचा अफेक्ट?; अमित शाहांनी दिल्या मराठीतून एकादशीच्या खास शुभेच्छा

Published On: 

मुंबई: आज (१० जुलै) आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून राजकीय मंडळीकडून नागरिकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र आजच्या एकादशी पर्वाला भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खास मराठीतून शुभेच्छा देणारे ट्वीट केले आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा करत अमित शाह (Amit Shah) आणि जे.पी. नद्दा यांची भेट घेतली आहे.

“आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी मी विठुरायाला वंदन करतो. आज दोन वर्षांनी भारतातील लाखो वारकरी बांधव आपल्या लाडक्या विठूमाऊलीचे दर्शन घेत आहेत. यापुढे कधीही असा खंड पडू नये आणि सर्वांचे मंगल व्हावे यासाठी विठुरायाकडे प्रार्थना! आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!”, असे ट्वीट अमित शाह यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील सरकार घडवण्यामागे मोदी-शाह यांचे सहकार्य-

दरम्यान काल दिल्लीत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते कि,” लोकांच्या मनात असलेलं सरकार आम्ही स्थापन केले आहे. सरकार स्थापन करण्यात पंतप्रधान मोदी, अमित शाह तसेच देवेंद्र फडणवीस यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेतली.” असे शिंदे यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा-

अनेक राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर स्थानापन्न झाले आहेत. यंदाचा महापूजेचा  मान कुणाला मिळणार, यावर अनेक चर्चा रंगत होत्या. अखेर तो मान नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच प्राप्त झाला. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ही पहिलीच महापूजा होती. असंख्य  वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!