🕒 1 min read
मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह हे काल ९ जुलै रोजी लग्नबांधनात अडकले. त्यांचा विवाहसोहळा आग्रा येथील जेपी पॅलेसमध्ये पार पडला. पायल आणि संग्राम यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. चाहते या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
हे दोघे जवळपास १२ वर्ष एकमेकांना डेट करत होते. आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि काल त्यांचा लग्नसोहळा पार पडला. पायलने लग्नामध्ये लाला रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. त्याचबरोबर संग्रामने डिझायनर शेरवानी आणि फेटा घातला होता. ते दोघेही लग्नाच्या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होते.
https://www.instagram.com/p/Cf0ZHP4rqqq/
पायलने डिझायनर लेहंगा, महागडी ज्वेलरी परिधान केली होती. पण यामध्ये एक खास बाब म्हणजे तिने स्वतःच्या लग्नात कुठल्याही प्रकारचा मेकअप केला नव्हता. ती नो-मेकअप लूकमध्ये पाहायला मिळाली. या लूकमुळे चाहत्यांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रश्न विचारले एका युजरने विचारलं की, “स्वतःच्याच लग्नात मेकअप का केला नाही?” असे वेगेवगेळे प्रश्न चाहते तीला विचारात आहेत. दरम्यान, दोन्ही कुटुंबाती मंडळी आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
