Share

T20 World Cup | पाकिस्तान आणि इंग्लंडपैकी कोण जिंकणार ट्रॉफी?, एबी डिव्हिलियर्सने केली भविष्यवाणी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आज मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऐतिहासिक टी 20 विश्वचषक (T20 World Cup) सामना होत आहे. यामध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान संघ आपसात भिडले आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करत पाकिस्तानी संघाला 138 धावांचे लक्ष दिले. दरम्यान माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) ने टी 20 विश्वचषक 2022 बाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. इंग्लंड किंवा पाकिस्तान संघ यात कोण जेतेपद घेऊन जाईल? आणि का घेऊन जाईल? याबद्दल एबीने भविष्यवाणी केली आहे.

माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स याने टी 20 विश्वचषक अंतिम सामना पूर्ण होण्याच्या आधी स्पर्धेच्या जेतेपदाबद्दल भविष्यवाणी केली आहे. एबीने इंग्लंड संघाला आपला पाठिंबा दिला असून या संघामध्ये फायर पॉवर आहे आणि इंग्लंड हा विश्वचषक घरी घेऊन जाईल, असे त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर आज सुरू असलेल्या या सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंड संघातील गोलंदाजांनी पाकिस्तान संघाला चांगली धूळ चाटत 137 धावांवर रोखले आहे.

एबी डिव्हिलियर्स याने ट्विटरवर एक पोल शेअर करत लिहिले आहे की, माझ्या बाजूने कोणताही अंदाज नाही परंतु तुम्ही सांगा की टी 20 विश्वचषक कोण जिंकू शकते? त्याने हे ट्विट रिट्विट करून म्हटले आहे की, “माझे वैयक्तिक मत, मॅन टू मॅन, इंग्लंडने नक्कीच कप घरी नेला पाहिजे.”

पुढे एबी म्हणाला आहे की, ” खेळाचा लय आणि महत्त्व पाहता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो संघ चांगला खेळतो संघ हा विश्वचषक घरी घेऊन जाईल. आता या स्पर्धेमध्ये कोण हरणार कोणास ठाऊक?” पाकिस्तान संघाने न्युझीलँड ला उपांत्य फेरीमध्ये पराभूत करून टी 20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर दुसरीकडे इंग्लंडने भारतीय संघाला पराभूत करत अंतिम फेरीत पात्र ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!