🕒 1 min read
मेलबर्न: ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक (T20 World Cup) चा आज अंतिम सामना सुरू आहे. हा ऐतिहासिक सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरू आहे. या अंतिम सामन्यांमध्ये इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakisthan) हे दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. आपल्या दुसऱ्या विश्वविजेतेपदासाठी दोन्ही संघ लढत आहे. तर इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून या सामन्यामध्ये प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करत इंग्लंड संघाने पाकिस्तानी संघाचा फज्जा उडवला आहे. इंग्लंड संघाने पाकिस्तानी संघाला 20 षटकात 8 बाद 137 धावांवर रोखले आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये दोन्ही संघ जिंकण्याचे इराद्याने उतरले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान संघातील बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांनी 29 धावांची सलामी दिली.रिजवान केवळ 15 धावा करून बाद झाला, तर दुसरीकडे आदिल राशीदने पाकिस्तानी संघाचा हुकुमी एका म्हणजेच बाबर आझम याला 28 चेंडू 32 धावा करत पॅवेलियनला पाठवले. तर शान मसुदने 38 धावा केल्या तर शाबाद खानने 20 धावांचे योगदान या सामनामध्ये दिले.
टी 20 विश्वचषक (T20 World Cup) अंतिम सामन्यात इंग्लंडने गमावल्या मोठ्या विकेट
इंग्लंड गोलंदाजांची गोलंदाजी करून झाल्यावर पाकिस्तान गोलंदाज देखील आक्रमक गोलंदाजी करताना दिसत आहे. पाकिस्तान संघाने इंग्लंडला पावर प्ले मध्ये जबरदस्त झटका दिला आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार जॉर्ज बटलर याला 26 धावा करून हारीस रौउफने बाद केले. त्यानंतर पाकिस्तान संघाच्या पहिल्या तीन विकेट्स पडल्यानंतर अष्टपैलू बेन स्टोक्स आणि हॅरी क्रूज यांनी संघाचा डाव सावरला आहे.
138 धावांचे लक्ष डोळ्यासमोर घेऊन मैदानावर उतरलेल्या इंग्लंड संघाला पाकिस्तान संघाने पावर प्ले च्या सुरुवातीलाच 2 धक्के दिले. यामध्ये शाईन आफ्रिदीने ॲलेक्स हिल्सला बाद केले. तर, चौथ्या षतकामध्ये हारिस रौउफने फिलिप्सल्टला 10 धावांवर बाद केले.
महत्वाच्या बातम्या
- Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचे बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, “ज्यांनी शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयी…”
- T20 World Cup | इंग्लंडला मोठा धक्का, हारिस रौउफने केला ‘हा’ गडी बाद
- T20 World Cup | पाकिस्तान आणि इंग्लंडपैकी कोण जिंकणार ट्रॉफी?, एबी डिव्हिलियर्सने केली भविष्यवाणी
- Ajit Pawar | “…म्हणून मी शिर्डीच्या शिबिराला गेलो नाही”, अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण
- Sushma Andhare | विभक्त पती करणार शिंदे गटात प्रवेश; सुषमा अंधारे म्हणाल्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

