Share

गौतम गंभीरने खासदार असूनही आयपीएलमध्ये काम करण्याबाबत दिली प्रतिक्रिया; काय म्हणाला? पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गौतम गंभीर हा सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणाकडे वळला. गौतम गंभीर सध्या पूर्व दिल्लीतून भाजपचा खासदार असला तरी त्याचे क्रिकेट जगताशी नाते कायम आहे. गौतम गंभीर कधी-कधी समालोचक म्हणून पाहायला मिळतो. त्याने आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. गंभीरच्या देखरेखीखाली आणि केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचला होता. पण संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यास अपयश आले.

गौतम गंभीर एक काळजीवाहू खासदार आहे. परंतु असे असूनही तो समालोचन करतो. तसेच आयपीएल संघासोबतही काम करतो. गंभीरला याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली आहे. खासदार होऊनही तो आयपीएलमध्ये का काम करतो. यावर गंभीर म्हणाला की, “मी दर महिन्याला ५००० लोकांना जेवण देतो. ज्यामध्ये २५ लाख रुपये खर्च केले जातात आणि वर्षभर पाहिले तर एकूण २ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले जातात. मी एक वाचनालयही बांधले असून त्यावर २५ लाख रुपये खर्च केले आहेत.”

गौतम गंभीर हे पूर्व दिल्ली मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. या माजी भारतीय क्रिकेटपटू आणि खासदाराने गांधी नगरमध्ये सार्वजनिक स्वयंपाकघर स्थापन केले आहे. जिथे लोकांना एक रुपयात जेवण दिले जाते. एवढेच नाही तर त्यांनी या भागात वाचनालयही स्थापन केले आहे. गौतम गंभीर आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सला दोनदा विजेतेपद मिळवून दिले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!