मुंबई : मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा कलाक्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे आपले अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरवरजनी पुरस्कारा’ने दरवर्षी गौरवण्यात येते. यावर्षीचे देखील पुरस्कार जाहीर झाले आहे. “सर्वश्रेष्ठ ‘कलागौरव पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेत्री उषा आणि डॉ. विलास उजवणे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचसोबत नाट्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गोट्या सावंत यांना ‘कर्मयोगी पुरस्कारा’ देण्यात आला आहे.
याशिवाय अनेक मान्यवरांना त्याच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देण्यात आले आहेत. चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत यावर्षीचा ‘सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा २०२२’ येत्या ७ जूनला मुंबई या ठिकाणी होणार आहे. या सोहळ्याला कलाकारांसोबत राजकीय व्यक्ती देखील उपस्थिती लावणार आहेत. राजकीय व्यक्तींमध्ये महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, अन्न नागरिक पुरवठामंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे सर्व उपस्थित राहणार आहेत.
चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान मागच्या अनेक वर्षांपासून पुरस्कार देण्याचे काम करत आहे. या संस्थेच्या वतीने आजपर्यंत अनेक लोकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण २६ जूनला ‘फक्त मराठी’ वाहिनीवर पाहता येईल. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :


