पुणे : वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद 2022 च्या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी साखर कारखाने आणि उस शेतीवर महत्वाचे भाष्य केले आहे.
“ईलेक्ट्रिक ट्रक आणि ट्रॅक्टर लवकरच लॉंच केले जाणार आहे. उसाचे भाव कमी करणे फार कठीण काम आहे. साखरेचे भाव कितीही असू दे, येणाऱ्या काळात याचा त्रास होणार आहे. येणाऱ्या काळात साखरेचे दर कमी होऊ शकतात. येणाऱ्या काळात २५ ते २६ रुपये किलो साखरेचा दर होईल. पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले की साखरेचे दर कमी होतात. इथेनॉलचा वापर झाला पाहिजे. यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी बोललो आहे. त्यासाठी आपण एक बैठक घेऊ,” असे नितीन गडकरी म्हणाले.
शरद पवारांनी केले नितीन गडकरींचे कौतुक –
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी शरद पवार यांनी नितीन गडकरी यांचं कौतुक केले. शरद पवार म्हणाले, “केंद्र सरकारमध्ये ऊसाचा, साखरेचा किंवा कुठलाही प्रश्न उभा राहिला तर मदतीसाठी नेहमी पुढे येणारे एकच मंत्री आहेत, ते म्हणजे नितीन गडकरी”. ते पुण्यात बोलत होते.
महत्वाच्या बातम्या –


