Share

“घोडेबाजार या शब्दाचा वापर झाला तर…” ; अपक्ष आमदाराचा शिवसेनेला इशारा

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर : ‘घोडेबाजार’ या शब्दावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. हा शब्द शिवसेनेच्या ( शिवसेना ) नेत्यांकडून वारंवार वापरल्या गेल्यास अपक्ष आमदारांना वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या बाबतीत अशी शंका घेणं चूक असून वारंवार घोडेबाजार-घोडेबाजार हा शब्द वापरल्याने मतदारसंघात आमची प्रतिमा खराब होत असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. या बाबत मुख्यमंत्री आणि विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणार असल्याची देखील जोरगेवार यांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे किशोर जोरगेवार यांनी शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३ मे हा शेवटचा दिवस होता. काल (शुक्रवार) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. मात्र, कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे याचा कोणत्या पक्षाला फायदा होतो आणि कुणाला धक्का बसतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १० जून २०२२ रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे.

भाजपने आमदार फोडण्याचे काम सुरू केले-

राज्यसभेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपकडून विजयाचे दावे – प्रतिदावे सुरु झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपने आमदार फोडण्याचे काम सुरू केले आहे, असा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजपवर आणि बहुजन विकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

“कोणते अपक्ष आमदार कुणाच्या बाजूने आहेत, हे निवडणुकीच्या दिवशी कळेल. कोण कुणाबरोबर आहे, हे १० तारखेला कळेल. बहुजन विकास आघाडी, एमआयएम कुठे आहे, बच्चू कडू कुठे आहेत, शेतकरी संघटना कुठे आहेत हे १० जूनला कळेल”, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!