मुंबई : शाहरुख खानने ३ जूनला दक्षिणेतील लोकप्रिय दिग्दर्शक अॅटलीसोबत त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण करत चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाबद्दल माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
चित्रपटामध्ये कोणकोणते कलाकर आहेत हे देखील चाहते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. साऊथची अभिनेत्री नयनतारा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, पण तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती नयनतारा नसून समंथा रुथ प्रभू होती. पण नागा चैतन्यमुळे या चित्रपटामध्ये काम करता आले नाही.
शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट पुढच्या वर्षी २ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्स्कुता वाढली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि नयनतारा यांची जोडी दिसणार आहे. एक आश्चर्यकारक बाब म्हणजे नयनतारा च्या आधी समंथा रुथ प्रभूला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण तिने नागा चैतन्यमुळे ही ऑफर नाकारली.
या कारणामुळे नाकारली चित्रपटाची ऑफर –
माहितीनुसार, “अभिनेत्रीने चित्रपटाला नाही म्हटले कारण ती तिचा पती नागा चैतन्य याच्यासोबत कुटुंबाला पुढे नेण्याचा विचार करत होती”. म्हणून तिने या चित्रपटाला नाही म्हटले. ती नाही म्हणल्यावर निर्मात्यांनी नयनताराशी संपर्क साधला आणि तिने लगेच चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
