Share

IND vs SA T20 Series : सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांशिवाय उतरणार भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख फलंदाज दिसणार नाहीत. एकीकडे भारताची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली भारतात पोहोचला आहे. आयपीएल २०२२ चा हंगाम एक फलंदाज म्हणून राहुलसाठी उत्कृष्ट ठरला आहे. यंदाच्या हंगामात त्याने ५१.३३ च्या सरासरीने ६१६ धावा केल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे बहुतेक खेळाडू आयपीएल २०२२ चा भाग होते. त्या खेळाडूंनी त्यांच्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. क्विंटन डी कॉकने आयपीएल २०२२ मध्ये १४८.९७ च्या स्ट्राइक रेटने ५०८ धावा केल्या आहेत. उभय संघांमधील टी-२० सामन्यांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. रोहितच्या नावावर ३६२ धावा आहेत तर सुरेश रैना ३३९ धावासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांशिवाय या यादीत विराट कोहली आणि शिखर धवनचे नाव आहे. कोहलीने २५४ तर धवनने २३३ धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील यशस्वी फलंदाज

दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे तर जेपी ड्युमिनी आणि एबी डिव्हिलियर्ससारखे फलंदाज आहेत. ड्युमिनीच्या नावावर २९५ तर डिव्हिलियर्सच्या २०८ धावा आहेत. विशेष म्हणजे यापैकी कोणताही खेळाडू भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या मालिकेचा भाग नाही. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी क्रिकेटमधून सन्यान घेतला असून रोहित आणि कोहली या मालिकेत भारताकडून खेळत नाहीत. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर धवनला संघात संधी मिळालेली नाही.

दोन्ही देशांमधील टी-२० मालिकत यशस्वी फलंदाज

३६२ धावा – रोहित शर्मा
३३९ धावा – सुरेश रैना
२९५ धावा – जेपी ड्युमिनी
२५४ धावा – विराट कोहली
२३३ धावा – शिखर धवन
२०८ धावा – एबी डिव्हिलियर्स

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!