बीड : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा १४ ऑगस्ट रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर अपघात झाला होता. दुसर्या दिवशी १५ ऑगस्टला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विनाय मेटे यांच्या मृत्यूबद्दल कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला आहे. आता विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही मेटे यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या की, तीन तारखेलाही असाच एक वाईट प्रकार घडला होता. त्या दिवशीही मेटे साहेबांची गाडी दुसर्या गाडीवर आदळावी अशा प्रकारे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरू होता. या घटनेचा आणि अपघाताचा काही संबंध आहे का हे तपासणे गरजेचे आहे असे मेटे म्हणाल्या.
मेटे यांचे सहाकारी अण्णासाहेब मायकर म्हणाले की, तीन तारखेला मेटेंसोबत प्रवास करताना चुकीच्या पद्धतीने आपली गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु त्या गाडीतील मुलं दारू प्यायलेली असावीत असा अंदाज मेटेंनी व्यक्त केला आणि तो प्रकार मेटेंनी फार गांभीर्याने घेतला नाही. मी जेव्हा पहिल्यांदा मेटे साहेबांना पाहिले तेव्हा त्यांच्या कानातून आणि डोळ्यांतून रक्त येत होतं. मेटेंचे शरीर पूर्ण पांढरे पडले होते. मेटेंची मी नाडी तपासली आणि बराच वेळ काय झाले हे कळालेच नाही असे ज्योती मेटे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- ITBP bus accident | जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; 7 जवानांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी
- Ajit Pawar | सत्ता आली म्हणून मस्ती आली का? ; अजित पवार शिंदे गटावर संतापले
- Devendra Fadnavis | गेल्या अडीच वर्षात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती – देवेंद्र फडणवीस
- Santosh Bangar | “मला झालेली मारहाण जनतेने बघितलीये”; बांगर यांनी केलेले आरोप मॅनेजरने फेटाळले
- Ramdas Athawale | निवडणूक आयोगाच्या निर्णयापूर्वी आठवलेंचे भाकीत! म्हणाले, “खरी शिवसेना…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

