Share

Vinayak mete | “मेटेंच्या पत्नींना राज्यपाल कोट्यातून आमदारकी द्या”; अंकुश काकडे यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. मेटेंच्या अपघाताची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते, कुटुंबीय आणि नेते मंडळींनीही केली आहे. एकीकडे विनायक मेटे यांच्या आईंनी तर आपल्या मुलासोबत घातपात झाला असावा असा थेट आरोप केला आहे. तर दुसरीकडे मेटेंच्या गाडीचा चालक एकनाथ कदम यानेही चौकशीत समाधानकारक उत्तरं दिली नसल्याची माहिती मिळाली आहे. या दरम्यान आता मेटेंच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.

“मेटेंच्या निधनानंतर त्यांच्या पत्नींना संधी मिळावी. शिवसंग्राम हा भाजपसोबतच्या युतीमधील एक महत्वपूर्ण घटकपक्ष आहे. तर विनायक मेटे यांनी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका आक्रमकपणे मांडली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपाने पुढाकार घ्यावा आणि मेटे यांच्या पत्नींना संधी द्यावी. ज्योती मेटे यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावं.”, अशी मागणी अंकुश काकडे यांनी केली आहे.

बावनकुळे यांनी दिलं आश्वासन

“मेटेंच्या अपघाताच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणा कामाला लावली आहे, त्यातून सत्य बाहेर येईल. तसेच विनायकराव मेटे यांच्या कुटुंबाची ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण केल्या जातील. ते माझे अत्यंत जवळचे जिवाभावाचे मित्र होते.”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

घातपात करण्याचा आधीही प्रयत्न?

विनायक मेटे यांचे सहकारी अण्णासाहेब मायकर म्हणाले की, “तीन तारखेला मेटेंसोबत प्रवास करताना चुकीच्या पद्धतीने आमच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न दोन गाड्या करत होत्या. परंतु त्या गाडीतील मुलं दारू प्यायलेली असावीत असा अंदाज मेटेंनी व्यक्त केला. त्यामुळे त्या प्रकाराला आम्ही फार गांभीर्याने घेतले नाही. तसाच काही प्रकार १४ तारखेलाही घडला असल्याची शक्यता आहे. मात्र या बाबतीत अजून कोणतेही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!