Share

ITBP bus accident | जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात; 7 जवानांचा मृत्यू तर काही जण गंभीर जखमी

Published On: 

🕒 1 min read

श्रीनगर : काश्मीरमधील पहलगाममध्ये आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्सची (ITBP) बस १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 7 जवान शहीद झाले आहेत. बसमध्ये 39 ITBP जवान आणि 2 जम्मू-काश्मीर पोलिस कर्मचारी होते. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व जवान अमरनाथ यात्रेमध्ये ड्युटी करून परत येत होते. चंदनवाडी येथून हे जवान पहलगामला येत होते. यादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात पडली. तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी जवानांना रुग्णालयात नेण्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच 19 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

जखमी जवानांवर जीएमसी अनंतनाग, जिल्हा रुग्णालय अनंतनाग आणि एसडीएच सीर येथे उपचार सुरू आहेत, असे अनंतनागचे उपायुक्त डॉ. पियुष सिंगला यांनी सांगितले आहे. आयटीबीपीचे डीजी एस. एल. थाओसेन यांनी सांगितले की, “या अपघातात सात जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर गंभीर जखमी असलेल्या आठ जवानांना उपचारासाठी श्रीनगरला नेण्यात आले आहे. बाकीच्या जवानांवर अनंतनाग येथील रुग्णालयात उपचार सुरू असून या जवानांची प्रकृती स्थिर आहे. आयटीबीपीचे पीआरओ यांनी सांगितले आहे कि, “आम्ही जखमींवर शक्य ते सर्व उपचार करू. आयटीबीपी मुख्यालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल.”, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

मृत्यू झालेले जवान
हेड कॉन्स्टेबल दुला सिंग, कॉन्स्टेबल सुभाष सी बैरवाल, कॉन्स्टेबल अभिराज, कॉन्स्टेबल दिनेश बोहरा, कॉन्स्टेबल अमित के, कॉन्स्टेबल संदीप कुमार , कॉन्स्टेबल डी राज शेखर, अशी या अपघातात मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत.

राष्ट्रपतींनी दुःख व्यक्त केले

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्या म्हणाlल्या, “जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात ITBP जवानांच्या जीवितहानीमुळे मला खूप दुःख झाले आहे. माझ्या प्रार्थना या जवानांच्या कुटुंबियांसोबत आहेत. तसेच जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करते.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!