Share

Vinayak Mete | विनायक मेटेंचा घातपातच?, शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

Published On: 

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे भीषण अपघातात निधन झाले. मेटे यांच्या अपघातावर त्यांचे कुटुंबीय, कार्यकर्ते आणि अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. विनायक मेटेंचा अपघात झाला नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मेटेंचा चालकही समाधानकारक माहिती देत नाहीये. त्यातच आता नुकतीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यात मेटेंचा कार्यकर्ता ३ ऑगस्टलाही मेटेंच्या गाडीचा पाठलाग केला जात होता असा दावा करत आहे.

दोन वाहने मेटेंच्या गाडीचा पाठलाग करत होती. तसेच मेटेंच्या गाडीला दाबण्याचा प्रयत्नही केला जात होता, असं हा कार्यकर्ता सांगत आहे. त्यामुळे मेटेंच्या वाहनाचा जाणूनबुजून अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय निर्माण होत आहे. तसेच मागचा सीटवर बसलेले मेटे अचानक पुढे का बसले? अपघात झाल्यावर मेटे गंभीर जखमी झाले पण मग त्यांच्या चालकाला काहीच कसं झालं नाही?, असे ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. पण या प्रकरणाचा पूर्ण तपास केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!