मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वा राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. यानंतर महाविकास आघाडीकडून सातत्याने सरकारला लक्ष्य केले जात आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीपासून ते खातेवाटपापर्यंत अनेक मुद्यांवरून टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
गेल्या अडीच वर्षात राज्यात सरकार नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. अडीच वर्ष ज्यांनी काहीही केले नाही, ते आज आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. माझे त्यांना एवढेच सांगणे आहे की 5 वर्ष आमचे सरकार होते. सरकार कसे चालते, हे आम्ही दाखवून दिले. आता पुन्हा एकदा आम्ही सत्तेत आलो आहोत. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अडीच वर्षात ७०० रुपये बोनस देतो असे सांगून एक नवा पैसा धानाच्या शेतकऱ्याला मिळाला नाही. आपण त्याच वेळी सांगितले होते की लबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नाही. हे लबाडच निघाले. पण आजच मुख्यमंत्र्यांसोबत मी बोनस देण्यासंदर्भात चर्चा करेन. आपले सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असे फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Raosaheb Danve| “…तिथे फोनवर बोलताना ‘वंदे मातरम’ म्हणणं चुकीचं नाही”; दानवेंनीही केले समर्थन
- Santosh Bangar । “…तर मी कायदा हातात घेणारच”; संतोष बांगर यांचे गंभीर विधान
- Shivendra Raje Bhosale | गणेशोत्सवात डॉल्बी सुरू करा ; शिवेंद्रसिंहराजेंची देवेंद्र फडणवीसांना मागणी
- Vinayak Raut । “उदय सामंत टक्केवारी घेऊन कामं करतात,..”; विनायक राऊतांचे खळबळजनक आरोप
- Sudhir Mungantiwar | श्वास कसा घ्यावा तुम्ही सांगणार का? आव्हाडांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

