Share

उमरान मलिकचा टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश करू नये, माजी खेळाडूंचं मोठं वक्तव्य!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकवर धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. उमरानला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. रवी शास्त्रींच्या मते, उमरान मलिकला एवढी मोठी संधी देणे घाईचे ठरेल. आधी त्याची नीट तयारी करून मगच त्याला एवढ्या मोठ्या मंचावर संधी द्यायला हवी.

उमरान मलिकला सुरुवातीला कसोटी संघासोबत तयार करावे लागेल – रवी शास्त्री

ईएसपीएन क्रिकइन्फोवरील संभाषणादरम्यान रवी शास्त्री यांनी उमरान मलिकबद्दल वक्तव्य केले. ते म्हणाले, “टी-२० वर्ल्डकपमध्ये उमरानला सध्या खेळवू नका. प्रथम त्याला तयार करा आणि त्याला संघासोबत घेऊन जा. त्याला प्रथम एकदिवसीय क्रिकेट किंवा लाल चेंडूच्या क्रिकेटने सुरुवात करू द्या. त्याला कसोटी संघासोबत ठेऊन तयार करा आणि मग बघा तो किती प्रगती करतो.”

उमरान मलिकची आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी राहिली होती. विशेषत: त्याने आपल्या वेगाने सर्वांनाच चकित केले होते. आयपीएलच्या १५ व्या मोसमातील तो दुसरा वेगवान गोलंदाज ठरला होता. उमरान मलिकने आयपीएल २०२२ मध्ये १५७ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. उमरानने गेल्या आयपीएल हंगामात १४ सामन्यांत २२ विकेट घेतल्या होत्या. त्याने एकदा एका डावात ५ बळीही घेतले होते. त्यामुळेच त्याची दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्याचवेळी उमरानचा वेग पाहून अनेक दिग्गज आणि चाहते त्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्ट्यांवर उमरान खूप प्रभावी ठरू शकतो, असा चाहत्यांना विश्वास आहे. मात्र अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी व माजी खेळाडूंनी उमरान मलिकचा वापर सावधगिरीने करण्याचेही सुचवले आहे. उमरानकडे वेगवान मारा करण्याची क्षमता आहे. पण त्याला आजूनही त्याच्या गोलंदाजीतील नियंत्रण आणि सातत्य यावर काम करण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!