Share

“एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही” ; दिपाली सय्यद यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Published On: 

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. साधारणत: राज्यसभेच्या निवडणुकीत जागांच्या अंकगणिताच्या आधारे उमेदवार उभे केले तर विजय निश्चित असतो आणि त्यामुळेच बहुतांश उमेदवार बिनविरोध विजयी होतात. पण इथे एक आव्हान होतं. ही लढत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होती. मात्र थेट भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेना विजयाची स्वप्ने पाहत राहिली आणि फडणवीस यांनी रणनीतीच्या क्षेत्रात स्वत:ला ‘सिद्ध’ केले. रात्री उशिरापर्यंतच्या गदारोळानंतर निकाल येताच भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला. तीन मोठ्या पक्षांची युती करून सरकार चालवणाऱ्या शिवसेनेला पुरेसे संख्याबळ असूनही संजय पवार यांनी परावभ पचवावा लागला. दरम्यान, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.

एकीकडे भाजपचे राज्यातील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांचा जयजयकार होत आहे. तर सत्ताधाऱ्यांनी भाजपवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद म्हणाल्या, “एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही. एका राज्यसभेने मुबंईचे महापौर बनता येत नाही. एका राज्यसभेने कोल्हापूर पोट निवडणूक जिंकतां येत नाही. १०६ काय १३० असुद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही.”

राज्यसभेच्या 6 जागांवर सत्ताधारी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार म्हणजेच शिवसेना + काँग्रेस + राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले. महाराष्ट्र विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे जास्त आमदार आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे. परंतु ही निवडणूक 3-3 अशी बरोबरीची होती. अशा स्थितीत फडणवीस विरुद्ध उद्धव अशी लढत झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या नेत्याचा मोठा वरचष्मा आहे. आपल्या कुशल रणनीतीच्या जोरावर फडणवीस यांनी सहावी जागा जिंकून आपण उद्धव यांच्यापेक्षा मोठे गेम चेंजर असल्याचे दाखवून दिले. तर शिवसेना उमेदवारी दिल्यापासून विजयाचे दावे करत होती.

सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला. तर शिवसेना दोन्ही जागा आरामात जिंकेल, असा दावा करत होते. सहाव्या जागेतील पराभवानंतर हताश शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने आमचे एक मत अवैध ठरवले आहे. भाजपचे दोन मते बाद करण्यासाठी आम्ही तक्रार केली. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. निवडणूक आयोग भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!