🕒 1 min read
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अनेक राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले. तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या निकालानंतर विरोधक शिवसेनेवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “सुहास कांदे याचं मत बाद कस झालं, हा संशोधनाचा विषय आहे. आम्ही त्याच कारणामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या मताला आक्षेप घेतला. मतदानावेळी धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं हे माहिती असूनही अमरावतीचे एक शहाणे जे उद्योग करत होते, ते आक्षेपार्ह होतं. आमचं मत बाद करून रात्री उशीरा आणि पहाटे काही गोष्टी करण्यात आल्या. यांना पापकृत्य करण्याची पहाटेची सवय आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा एकदा घोडेबाजार करून टाका”,
तसेच घोडेबाजारातील घोड्यांमुळे सरकारवर फरक पडणार नाही. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, अपक्षांनी हरभरे खाल्ले आहेत. समोरच्याने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासली. घोडेबाजारात जे विकले गेले त्यांची नोंद झाली आहे. काही लोकांनी शब्द देऊन फसवणूक केली. शिवसेनेला कोणताही झटका लागलेला नाही. मात्र हा काही भाजपचा मोठा विजय नाही. असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Rajya Sabha election results : संजय पवार यांच्या पराभवामागील कारण प्रफुल्ल पटेल यांनी केले स्पष्ट; म्हणाले…
- बापरे! देशामध्ये एका दिवसात ८३२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
- PAK vs WI 2022 : बाबर आझमच्या खेळीनं अन् मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीने वेस्टइंडिज गारद
- “देश संविधानानुसार चालतो तुमच्या मानण्या…”, ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला
- वीज कोसळण्यापूर्वीच नागरिकांना ‘या’ अँपवरून मिळणार अलर्ट, वाचा सविस्तर माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
