Share

PAK vs WI 2022 : सामना सुरू आसताना ‘या’ पाकिस्तानी चाहत्याने पाहा काय केलं? VIDEO झाला व्हायरल!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पाकिस्तान आणि वेस्टइंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान असा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून क्रिकेट चाहत्यांना खूप आनंद होईल. पाकिस्तानच्या फलंदाजीच्या वेळी एक चाहता मैदानात घुसला होता आणि त्याला शादाब खानला भेटायचे होते. शादाबने चाहत्याला निराश न करता त्याला प्रेमाने मिठी मारली. कोविड-१९ प्रोटोकॉल पाहता शादाबने चाहत्यासोबत रागावलेले वर्तन केले नाही. याच गोष्टीला लोक सोशल मीडियावर पसंत करत आहेत.

शादाबला फलंदाजीत खास कामगिरी करता आली नाही आणि २३ चेंडूत २२ धावा करून तो बाद झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ८ गड्यांच्या मोबदल्यात २७५ अशी धावसंख्या उभारली होती. कर्णधार बाबर आझम आणि इमाम-उल-हक यांनी अर्धशतके केली होती. याशिवाय तळाच्या फलंदाजांनीही मोलाचे योगदान देत संघाची धावसंख्या अडीचशेच्या पुढे नेली.

गोलंदाजांनी पाकिस्तानला मोठा विजय मिळवून दिला

पाकिस्तानने दिलेल्या २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने संघाच्या ४ धावसंख्येवर पहिला गडी गमावला. मात्र, यानंतर काईल मेयर्स (३३) आणि शमारह ब्रूक्स (४२) यांनी ६७ धावांची भर घालत डावाची धुरा सांभाळली. त्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी कॅरेबियन डाव उधळून लावला आणि संपूर्ण संघ ३२.२ षटकात केवळ १५५ धावा करून सर्वबाद झाला. पाकिस्तानने हा सामना १२० धावांनी जिंकला. मोहम्मद नवाजने पाकिस्तानसाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली आणि १० षटकांत केवळ १९ धावा देत ४ गडी बाद केले. शादाबनेही गोलंदाजीत मोलाचे योगदान दिले. त्याने ९ षटकांत ४० धावा देत २ बळी घेतले. शाहीन आफ्रिदीने केवळ ४ षटके टाकली आणि १७ धावांत १ बळी घेतला. १३ चेंडूत नाबाद १७ धावा करणाऱ्या मोहम्मद वसीम ज्युनियरने ४.२ षटकात ३४ धावा देत ३ गडी बाद केले.

या सामन्यातील विजयाने पाकिस्तानने ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. आता पाकिस्तानी संघाचे लक्ष्य वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देण्याकडे असेल. तर वेस्टइंडिजचा संघ मालिकेतील शेवटचा सामना जिंकून सन्मान राखण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यात वेस्टइंडिजच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडीज संघाचे फलंदाज पूर्णपणे ढेपाळले. या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना १२ जूनला खेळायला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!