टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावरून गेल्या काही दिवसांत अनेक घडामोडी घडत आहेत. उदयनराजे भाजपमध्ये दाखल होणार की राष्ट्रवादीतच राहणार, याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. अशातच उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेशाबाबत मिश्कील वक्तव्य केले आहे. तुम्हालाही ईडीची भीती दाखवून भाजपमध्ये जाण्यास भाग पाडण्यात येत आहे का,’ असा प्रश्न उदयनराजेंनाही विचारण्यात आला. यावर उदयनराजेंनी खुमासदार उत्तर दिल आहे.
‘माझ्यावर प्रेम करणारी इतकी येडी असताना मला ईडीची भीती कशी वाटेल,’ अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे. उदयनराजें हे वक्तव्य सोशल मिडीयामध्ये चांगलेचं व्हायरल होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर काही नेत्यांनी ‘ईडी’च्या भीतीमुळे भाजपात प्रवेश केला आहे, असे विरोधकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले देखील ‘ईडी’ला घाबरूनचं भाजपात प्रवेश करत आहेत का ? असे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र उदयनराजेंनी आपल्या शैलीत या प्रश्नाला टोलवले आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या जाणाऱ्या नेत्यांमध्ये काही शरद पवारांच्या विश्वासू नेत्यांचा देखील समावेश आहे. तर पवारांना आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण सातारचे खा.उदयनराजे भोसले देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. कारण खुद्द खा. उदयनराजे भोसले यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
- पी. चिदंबरम यांच तिहार जेल टळलं, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय कोठडीतचं केली वाढ
- तुळजापूर मतदारसंघासाठी रोहन देशमुखांचे पारडे जड, मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीला दिला ग्रीन सिग्नल
- कॉंग्रेसला खिंडार, ‘हा’ मात्तबर नेता शिवसेनेत दाखल
- निवडणुकीत खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

