Share

पी. चिदंबरम यांच तिहार जेल टळलं, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय कोठडीतचं केली वाढ

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाने कॉंग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिलासा दिला आहे. पी. चिदंबरम यांना सीबीआय कोठडीतच ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे तूर्ततरी चिदंबरम यांची रवानगी दिल्लीतील तिहार तुरुंगात होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारचे अधिवक्ता तुषार मेहता यांनी सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करताना चिदंबरम यांची चौकशी सीबीआयकडून पूर्ण झाली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे चिदंबरम यांची आता कोणतीही चौकशी होणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

न्या. आर. बानूमती यांच्या नेतृत्त्वाखालील दोन सदस्यीय खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने चिदंबरम यांना ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले. चिंदबरम यांच्यावतीने न्यायालयात युक्तिवाद करताना कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी आम्ही पाच सप्टेंबरपर्यंत उच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहू, असे म्हंटले आहे.

दरम्यान आयएनएक्स मीडिया प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी पी. चिदंबरम यांना चौकशीसाठी सीबीआय कोठडी सुनावली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयने रद्द केलेल्या जामीन विरोधात चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयाने मात्र त्यांचं अपील फेटाळून लावलं आहे. चिदंबरम यांच्यावर परदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून आयएनएक्स मीडियाला बेकायदेशीरपणे मान्यता देण्यासाठी 305 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत अंतरिम संरक्षणासाठी चिदंबरम यांना सुमारे दोन वेळा कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. चिदंबरम अर्थमंत्री असताना ही घटना 2007 ची आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!