टीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकीतील तुळजापूर मतदारसंघाचा युतीचा उमेदवार निश्चित झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उमेदवाराला पसंती दर्शवली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख हे भाजपकडून तुळजापूर मतदारसंघाचे उमेदवार असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा लातूर येथून सोलापुर जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी रोहन देशमुख हे तब्बल तीन तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर रथात होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहन देशमुख यांच्याकडून विधानसभा मतदार संघाची सविस्तर माहिती घेतली. तसेच निवडणुकीच्या कामाला लागा आणि विजय मिळवा अशा शुभेच्छा रोहन देशमुख यांना दिल्या असल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान तुळजापूर विधानसभा मतदार संघात न भूतो ना भविष्यती असा प्रतिसाद भाजपच्या यात्रेला मिळाला. तसेच भाजपा ने कॉंग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्याला उध्वस्त करण्याचा संकल्पचं केला आहे. त्या दृष्टीने भाजपने व्यूहरचना आखून त्या पध्दतीने वाटचाल सुरु केल्याचेही दिसून येते आहे. या यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस उमेदवारांची देखील चाचपणी करत आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत तुळजापूर मतदारसंघातून भाजपकडून रोहन देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.
- कॉंग्रेसला खिंडार, ‘हा’ मात्तबर नेता शिवसेनेत दाखल
- निवडणुकीत खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला अटक
- नेते पक्ष सोडून जात असले तरी कार्यकर्ते मात्र खंबीर आहेत : रोहित पवार
- ‘गरज पडेल तेव्हा भाजप पवारांचाचं सल्ला घेतं, निवडणुकीत मात्र त्यांनाचं लक्ष्य करत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
