टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याच्या प्रकरणावरून अजित जोगी यांचा मुलगा अमित जोगी यांना अटक करण्यात आली आहे.
२०१३ मधील विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज भरताना अमित जोगी यांनी आपल्या जन्मतारखेबद्दल चुकीची माहिती भरली होती. त्याचबरोबर फेरफार केलेली कागदपत्रे जोडली आहेत, असा आरोप भाजपच्या उमेदवारांनी केला होता. त्या नंतर या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. त्यामध्ये अमित जोगी हे दोषी आढळून आले. त्यानंतर अमित जोगी यांना विलासपूर पोलिसांनी अटक केली.
भारतीय दंड विधान संहितेतील कलम ४२०, ४६७, ४६८ आणि ४७१ नुसार अमित जोगी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. २०१३ मध्ये भाजपच्या उमेदवार समीरा पैक्रा यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अमित जोगी यांना मंगळवारी सकाळी अटक केली आहे.
- नेते पक्ष सोडून जात असले तरी कार्यकर्ते मात्र खंबीर आहेत : रोहित पवार
- ‘गरज पडेल तेव्हा भाजप पवारांचाचं सल्ला घेतं, निवडणुकीत मात्र त्यांनाचं लक्ष्य करत’
- ‘सरकार किती वेळा खोट बोलणार ? शेवटी मंदीचं वास्तव समोर आलचं’
- कॉंग्रेसचा ‘हा’ माजी मंत्री भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

