टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. तर आज उस्मानाबाद जिल्हयातील कॉंग्रेसचे नेते प्रशांत बाबा चेडे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. चेडे यांच्या पक्षांतरामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कॉंग्रेसला खिंडार पडले आहे.
प्रशांत चेढे यांच्याकडे काँग्रेसचे जिल्हयातील तिसऱ्या क्रमांकाचे पद होते. मात्र काँग्रेसने त्यांना जिल्हापरिषद अध्यक्ष पद डावल्यापासून ते काँग्रेसवर नाराज होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांच्यासह काँग्रेसच्या ३ तालुकाध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. या सर्वांचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठवले होते. त्यानंतर आज प्रशांत चेडे यांनी शिवबंधन हाती बांधले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेना आणखीच मजबूत होणार आहे.
तसेच पंचायत समिती, नगर पालिका आणि बाजार समिती यासह अनेक स्थानिक स्वराज्य संस्था चेडेंच्या ताब्यात आहेत त्यामुळे शिवसेना प्रवेशामुळे या सर्व ठिकाणी आता शिवसेनेचे वर्चस्व निर्माण होणार आहे. प्रशांत चेडे यांनी महादेव अंधारे, बिभिषण खामकर, आण्णासाहेब देशमुख, सुभाषसिंह सिध्दिवाल, प्रकाश शिंदे, नितिन खंडेराव चेडे, नागनाथ प्रभू, प्रसाद जोशी, सुनिल जाधव, छगनराव मोळवणे, विजसिंह थोरात आदी नेत्यांसह नगरसेवक,सोसायटीचे चेअरमन,सरपंच यांनी आज उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
- निवडणुकीत खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाला अटक
- नेते पक्ष सोडून जात असले तरी कार्यकर्ते मात्र खंबीर आहेत : रोहित पवार
- ‘गरज पडेल तेव्हा भाजप पवारांचाचं सल्ला घेतं, निवडणुकीत मात्र त्यांनाचं लक्ष्य करत’
- ‘सरकार किती वेळा खोट बोलणार ? शेवटी मंदीचं वास्तव समोर आलचं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

