Share

“तीन चाकी सरकारनं कायद्यात राहून राज्य करावं”, आ. कीर्तीकुमार भांगडिया

Published On: 

मुंबई : राज्यातील १२ भाजप आमदारांचे वर्षभरासाठी करण्यात आलेले निलंबन हायकोर्टाने रद्द केले आहे. याबाबतचा निर्णय आज हायकोर्टाने दिला आहे. एक वर्षासाठी आमदारांचे निलंबन करणे अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. यावरुन भाजप नेते महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधत आहेत. या निलंबित आमदारांपैकी एक असेलेले आ. कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तीन चाकी सरकारनं कायद्यात राहून राज्य करावं, असा इशराच आमदार भांगडिया यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

चिमूरचे भाजप आमदार कीतिकुमार उर्फ बंटी भांगडिया म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठी चपराक दिली आहे. आता आमचं निलंबन रद्द झालं आहे. मतदारांचे प्रश्न सभागृहात मांडून आम्ही सोडवू शकतो, याचा आनंद आहे. तसेच हे सरकार या राज्याच्या विरोधात एखादा निर्णय घेत असेल. कोट्यवधी लोकांचं नुकसान होत असेल तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सभागृहात सरकारला आम्ही धारेवर धरू. दोन वर्षांपासून राज्य सरकार कायद्यानुसार चालत नाही. आता सर्वोच्च न्यायालयानेच सरकारला चपराक दिली आहे. आता या तीन चाकी सरकारला विनंती आहे की, त्यांनी कायद्यात राहून राज्य चालवावे. नाही तर तुम्हाला चुकीच्या कामांसाठी आम्ही धारेवर धरणार’ असे आमदार भांगडिया म्हणाले.

निलंबन मागे घेतलेल्या आमदारांच्या यादीत आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, पराग अळवणी, अतुल भातखळकर, संजय कुटे, योगेश सागर, हरीश पिंपळे, जयकुमार रावल, राम सातपुते, नारायण कुचे, बंटी भांगडिया अशी १२ आमदारांची नवे आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!