मुंबई : राज्यातील १२ भाजप आमदारांच्या निलंबनाबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या सर्व १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने (Big decision of High Court) रद्द केले आहे. त्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘ठाकरे सरकार थोबाड फोडून घेण्याचा विश्वविक्रम करण्याच्या तयारीत. गाढव आणि ब्रह्मचर्य दोन्ही गेले.’ अशी टीका अतुल भातखळकरांनी केली आहे.
ठाकरे सरकार थोबाड फोडून घेण्याचा विश्वविक्रम करण्याच्या तयारीत. गाढव आणि ब्रह्मचर्य दोन्ही गेले. pic.twitter.com/bZUa9KSEkr
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 28, 2022
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याने तसेच शिवीगाळ केल्याने आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याकारणाने या १२ आमदारांचे ५ जुलै २०२१ रोजी निलंबन करण्यात आले होते. याप्रकरणी भाजपने सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. आणि यावरच कोर्टाने हा महत्वाचा निर्णय आज दिला आहे.
दरम्यान १२ आमदारांच्या निलंबनावरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले आहे. एक वर्षासाठी आमदारांचे निलंबन करणे अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, पराग अळवणी, अतुल भातखळकर, संजय कुटे, योगेश सागर, हरीश पिंपळे, जयकुमार रावल, राम सातपुते, नारायण कुचे, बंटी भांगडिया अशी १२ आमदारांची नवे आहेत.
महत्वाच्या बातम्या
हायकोर्टाचा मोठा निर्णय! ‘त्या’ १२ भाजप आमदारांचे निलंबन रद्द
“गांजाप्रकरणातील अनुभवानुसार वाईनविक्रीच्या घोषणेची जबाबदारी नवाब मलिकांना दिली असावी”
“विरोधात असताना दारूला विरोध आणि सत्तेत असताना प्रोत्साहन देण्याची भाजपची रणनीती आहे का?”
वाढत्या परीक्षा घोटाळ्यांमुळे संपूर्ण देशात मिलिट्री राज लावायला हवं- बच्चू कडू
“…हा हिंदुद्वेष्टाच होता पद गेल्यानंतर पिसाळलाय”, अन्सारींच्या वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

