मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरुन भाजप नेते तथा माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ड्राय डे ला किराणा दुकान आणि सुपर मार्केट बंद ठेवणार का? असा सवाल ठाकरे सरकारला केला आहे.
ड्राय डे ला किराणा दुकान आणि सुपर मार्केट बंद ठेवणार का…? ????
नशेडी महाविकास आघाडी सरकारने याचेही उत्तर जनतेला द्यावे. आता एवढेच सांगायचे आणि करायचे शिल्लक राहिले आहे.@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @CTRavi_BJP @SMungantiwar @PrasadLadInd @Parinayfuke @RamVSatpute— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) January 28, 2022
याबाबत चंद्रशेखर बावनकुळे ट्विट करत म्हणाले, ‘ड्राय डे ला किराणा दुकान आणि सुपर मार्केट बंद ठेवणार का…? नशेडी महाविकास आघाडी सरकारने याचेही उत्तर जनतेला द्यावे. आता एवढेच सांगायचे आणि करायचे शिल्लक राहिले आहे.’ असा सवाल करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना त्याबाबतची माहिती दिली. नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्रात अनेक वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली होती. यावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
हायकोर्टाचा मोठा निर्णय! ‘त्या’ १२ भाजप आमदारांचे निलंबन रद्द
“गांजाप्रकरणातील अनुभवानुसार वाईनविक्रीच्या घोषणेची जबाबदारी नवाब मलिकांना दिली असावी”
“विरोधात असताना दारूला विरोध आणि सत्तेत असताना प्रोत्साहन देण्याची भाजपची रणनीती आहे का?”
वाढत्या परीक्षा घोटाळ्यांमुळे संपूर्ण देशात मिलिट्री राज लावायला हवं- बच्चू कडू
“…हा हिंदुद्वेष्टाच होता पद गेल्यानंतर पिसाळलाय”, अन्सारींच्या वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र


