मुंबई : राज्यातील १२ भाजप आमदारांच्या निलंबनाबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या सर्व १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. एकीकडे भाजपकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारसाठी धक्का असल्याचे बोलले जात आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे.
यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘महा बिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलंय. कायदा-नियम पायदळी तुडवून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले पण सुप्रीम कोर्टाने हे निलंबन रद्द केले आहे. महा बिघाडी सरकार किती असंविधानिक आणि खुनशी वागतंय हे स्पष्ट झालंय.’ तसेच हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है’, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
महा बिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलंय..
कायदा- नियम पायदळी तुडवून #bjp १२ आमदारांचे निलंबन केले पण सुप्रीम कोर्टानं निलंबन रद्द केलंय
महा बिघाडी सरकार किती असंविधानिक आणि खुनशी वागतंय हे स्पष्ट झालंय
हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या?
फ्लॉवर नहीं????फायर????है..!????— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 28, 2022
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याने तसेच शिवीगाळ केल्याने आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याप्रकरणीया १२ आमदारांचे (suspension of 12 BJP MLAs) ५ जुलै २०२१ रोजी निलंबन करण्यात आले होते. या १२ आमदारांमध्ये आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, पराग अळवणी, अतुल भातखळकर, संजय कुटे, योगेश सागर, हरीश पिंपळे, जयकुमार रावल, राम सातपुते, नारायण कुचे, बंटी भांगडिया यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
हायकोर्टाचा मोठा निर्णय! ‘त्या’ १२ भाजप आमदारांचे निलंबन रद्द
सगळ्यांनी अधिकाधिक दारू ढोसावी, असं बहुधा या सरकारचं मत आहे- चंद्रकांत पाटील
“सत्याचा विजय झाला… ‘मविआ’ सरकारला न्यायालयाकडून झटका!”, प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया
“महाभकास आघाडी सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा ‘हा’ निर्णय”, भातखळकरांचे टीकास्त्र
“…हा हिंदुद्वेष्टाच होता पद गेल्यानंतर पिसाळलाय”, अन्सारींच्या वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र


