Share

“सत्याचा विजय झाला… ‘मविआ’ सरकारला न्यायालयाकडून झटका!”, प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : राज्यातील १२ भाजप आमदारांच्या निलंबनाबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या सर्व १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने (Big decision of High Court) रद्द केले आहे. त्यावर भाजप नेते तथा विधान परिषदेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत प्रविण दरेकर ट्विट करत म्हणाले, ‘सत्याचा विजय झाला… महाराष्ट्र विधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करीत आहे. या निकालामुळे महाविकास आघाडी सरकारला न्यायालयाकडून झटका!’ असे ट्विट प्रविण दरेकरांनी केले आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याने तसेच शिवीगाळ केल्याने आणि तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याकारणाने या १२ आमदारांचे ५ जुलै २०२१ रोजी निलंबन करण्यात आले होते. याप्रकरणी भाजपने सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. आणि यावरच कोर्टाने हा महत्वाचा निर्णय आज दिला आहे.

दरम्यान १२ आमदारांच्या निलंबनावरील सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले आहे. एक वर्षासाठी आमदारांचे निलंबन करणे अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, पराग अळवणी, अतुल भातखळकर, संजय कुटे, योगेश सागर, हरीश पिंपळे, जयकुमार रावल, राम सातपुते, नारायण कुचे, बंटी भांगडिया अशी १२ आमदारांची नवे आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!