Share

मोदी सरकार महिला विरोधी असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पातून पुन्हा सिद्ध झाले; महिला काँग्रेसची टिका!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: यंदाचा अर्थसंकल्प हा पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आला आहे. जनतेची दिशाभूल करणारे हे बजट आहे. कोरोना सारख्या जागतिक महामारीत गेल्या दोन वर्षात ३ कोटी ५० हजार युवक बेरोजगार झाले आहेत. आणि ६० हजार तरुणांना रोजगार मिळेल अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. यात बाकीच्या तरुणांनी करायचे काय? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव सरोज मसलगे पाटील(Saroj Masalge Patil) यांनी उपस्थित केला आहे. तसेच महिला सुरक्षेचा मुद्दाही कुठेही दिसून आला नाही. त्यावरून हे सरकार महिलांविरोधी असल्याचे सिद्ध होते असेही त्या म्हणाल्या.

मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली. तब्बल ६० लाख नव्या नोकऱ्या, ४०० नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी बजेटची ओपनिंग केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीत मोठी गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा केली आहे. मात्र विरोधकांकडून मोदी सरकारला या अर्थसंकल्पावर चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे.

हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांची निराशा करणारा असून पूर्णपणे फसवा असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. औरंगाबाद महिला काँग्रेसच्या सरोज मसलगे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, देशाच्या एकुण लोकसंख्येच्या ५० % महिला लोकसंख्या आहेत. त्यासाठी सुक्ष्म, लघु, उद्योगासाठी विशेष सवलत, सुलभ बिनव्याज दरात कर्ज उपलब्ध करण्याची तरतुद हवी होती. मात्र ते या अर्थसंकल्पात दिसत नाही. महिला सुरक्षेचा मुद्दा हे सरकार पूर्णपणे विसरले आहे. पुन्हा एकदा यातून हे सरकार महिला विरोधी आहे. हे सिद्ध होते. सौर उर्जेचे गाजर मागील अर्थसंकल्पात दाखवण्यात आले होते. यंदाही ते आश्वासन कायम आहे. भरीव निधि सोलारला दिला होता. परंतु त्यांची अंमलबजावणी होतांना दिसली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!