सिंधदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँक बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यासंबंधी जामीन अर्ज माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. १८ डिसेंबर २०२१ रोजी संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर कणकवली येथे हल्ला झाला होता. याप्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. तसेच आता याबाबत नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरणात नितेश राणे यांचा जामीन अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, नितेश राणे यांनी कोर्टात शरणागतीचा कोणताही अर्ज केलेला नाही. जोपर्यंत शरण येत नाहीत तोपर्यंत जामीन अर्जासाठी पात्र होता येत नाही. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जामीन मिळत नाही, असं परब म्हणाले.
आमदार नितेश राणे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आतापर्यंत राज्यसरकारने वेगवेगळ्या पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, मात्र आता मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर ठेऊन मी स्वतः सरेंडर होण्यासाठी कोर्टात जात आहे, असं नितेश राणे यांनी सांगितले आहे. सिंधदुर्गच्या कणकवली येथील दिवानी न्यायालयात नितेश राणे हजर झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
…आणि म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला राजकारणातून संन्यास
शेतकऱ्यांविषयी भाजपचे बेगडी प्रेम यंदाच्या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा सिद्ध झाले-अंबादास दानवे
शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘जुमले का अर्थसंकल्प’ सादर करत नाही- किशोरी पेडणेकर
‘घेराईयां’ मधील ‘इंटिमेट सीनवर’ अनन्याच्या कुटूंबियांची अशी होती प्रतिक्रिया, जाणून घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

