नवी दिल्ली: आज संसदेत शिवसेना खासदारांनी एसी लोकलचे तिकीट दर सामान्य माणसाला परवडणारे करावे, अशी मागणी लोकसभेत केली. “मुंबईत धावणाऱ्या एसी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी एसी लोकलचे तिकीट दर सामान्य माणसाला परवडणारे करा”, अशी स्पष्ट मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.
लोकसभेत रेल्वेच्या अनुदान मागण्यांसंदर्भात बोलाताना ही मागणी केली गेली. रेल्वेने रेल्वे जमिनीवर अनधिकृपणे राहणाऱ्या लाखो नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. मुंबई-ठाण्यासह आसपासच्या परिसरात लाखो नागरिकांवर बेघर होण्याची टांगती तलवार होती. आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जोपर्यंत या रहिवाशांच्या पुर्नवसनाचा मार्ग सुटत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई करु नये, अशी मागणी रेल्वे मंत्री तसेच रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे केली.
तसेच नुकत्याच कार्यान्वित झालेल्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांवरुन चालवण्यात येणाऱ्या एसी लोकल सेवेचे भाडे कमी करावे व नॉन एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणीही श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

