मुंबई : बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. नुसरत जहाँचे बिझनेसमन निखिल जैनसोबतचे (Nikhil Jain) लग्न तुटले तसेच निखिलपासून विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. त्यानंतर आता नुसरत जहाँ यांनी बॉयफ्रेंड आणि अभिनेता यश दासगुप्तासोबतच्या (Yash Dasgupta) नात्याबद्दल खुलासा केलं आहे. नुसरतने यशशी मी पुन्हा लग्न (second marriage) करणार नाही असं म्हटल्याने चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान एका मुलाखतीमध्ये नुसरत म्हणाल्या, ‘मला माहिती नाही का मात्र लोकांना माझ्या लग्नाविषयी जाणून घेण्यात इतका रस का आहे. जर मला माझ्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं नसेल तर तो पूर्णपणे माझा निर्णय आहे. लग्न झालेल्या दोन्ही व्यक्ती जर आनंदी असतील तर आणखी काय हवे?’ पुढे त्यांना यश दासगुप्तासोबत लग्न करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी, ‘मी यशशी पुन्हा लग्न करणार नाही. हे ऐकायला कसं वाटतं?’ असे उत्तर दिले आहे.
नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांनी एकमेकांशी लग्न केलय की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून तर त्या दोघांनी लग्न केले आहे असं दिसून येते. काही दिवसांपूर्वी नुसरतने इन्स्टाग्रामवर एक केकचा फोटो शेअर केला होता. ज्यावर ‘पती आणि वडील’(Husband and father) असे लिहिले होते.
याशिवाय त्यांचा मुलगा इशानच्या जन्म प्रमाणपत्रावरही यशचे नाव आहे. तिच्या डिलिव्हरीच्या वेळीही यश तिच्यासोबत राहून तिची काळजी घेताना दिसला होता. आता पुन्हा एकदा त्या दोघांच्या वैयक्तिक आयुष्यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
…आणि म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला राजकारणातून संन्यास
शेतकऱ्यांविषयी भाजपचे बेगडी प्रेम यंदाच्या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा सिद्ध झाले-अंबादास दानवे
शिवसेना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘जुमले का अर्थसंकल्प’ सादर करत नाही- किशोरी पेडणेकर
‘घेराईयां’ मधील ‘इंटिमेट सीनवर’ अनन्याच्या कुटूंबियांची अशी होती प्रतिक्रिया, जाणून घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

