औरंगाबादः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या रंगात भेसळ आहे, असं वक्तव्य नुकतंच केलं असून त्याला रावसाहेब दानवे यांनी चांगलचं प्रत्युत्तर दिलं. म्हणाले, आमचा रंग ओरिजनल आहे. कुणाचा रंग कसा आहे, हे निवडणुकीत ठरतं. शिवसेनेनं दाऊदच्या माणसाला साथ दिली तेव्हाच त्यांचा रंग फिका पडलाय अशी फटकेबाजी भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
संजय राऊतांना प्रत्युत्तर- आमचा रंग ओरिजनल
“संजय राऊत यांच्यावर टीका करताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘आमचा रंग ओरिजिनल आहे. रंग कुणाचा चांगला आहे, हे निवडणुकीत ठरतं. शिवसेनेचा रंग तेंव्हाच फिका पडला जेव्हा त्यांनी दाऊदच्या माणसाला साथ दिली.
तसेच आमचं सरकार येणार आहे, आणि पुढची 25 वर्षे आमचं सरकार टिकणार आहे. काँग्रेस मध्ये आता काहीही बदल होऊ शकत नाही, काँग्रेस हा आता प्रादेशिक पक्ष सुद्धा राहिलेला नाही आप आणि काँग्रेस बरोबरीत आलेले आहेत”, असं वक्तव्य दानवे यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या –


