🕒 1 min read
औरंगाबाद: देशातील सर्वसामान्य नागरिकांना आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया यासारखे गोंडस शब्दप्रयोग करत केंद्राने पुन्हा एकदा घात केला आहे. मूलभूत सोयी सुविधा देण्याऐवजी मोठमोठ्या घोषणाबाजी करून तरुण, युवकांना बेरोजगार केले आहे. भाजपशासित राज्यांचे उत्पन्न कमी असतांना त्यांना वर्षभर अनुदानाच्या माध्यमातून निधी देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. फुसक्या व पोकळ अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थराज्यमंत्री यांच्याकडून निराशा झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी दिली.
मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली. तब्बल ६० लाख नव्या नोकऱ्या, ४०० नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी बजेटची ओपनिंग केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीत मोठी गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा केली आहे. विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर या अर्थसंकल्पावर टीका केली जात आहे.
सर्वसामान्य नागरिकांनी युवा वर्गाची या अर्थसंकल्पातून घोर निराशा झाल्याचा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. तर शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले यंदाचा अर्थसंकल्पात मूलभूत सोयी सुविधांएेवजी मोठ्या मोठ्या घोषणांचा बार उडवला आहे. युवकांसाठी नव्या नोकऱ्यांची अधिक प्रमाणात निर्मिती करायला हवी होती. मात्र पुन्हा एकदा तरुण वर्गाच्या पदरी निराशाच पडली आहे. यंदाचा अर्थसंकल्पामुळे तरुणांना यंदाही बेरोजगार राहावे लागणार आहे. मात्र ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे त्या राज्यांना भरघोस निधी देण्यात आलेला आहे. असा आरोपही यावेळी खैरे यांनी मोदी सरकारवर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
