Share

फडणवीसांची चौकशी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा- रावसाहेब दानवेंचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: फोन टॅपिंग आणि पोलीस बदल्यांप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब आज पोलिसांनी त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन नोंदवला. दरम्यान जेव्हा फडणवीसांना नोटीस पाठवण्यात आली होती तेव्हापासूनच भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज पोलिसांकडून फडणवीसांची सुमारे २ तास चौकशी करण्यात आली. यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

यावेळी दानवे म्हणाले कि, भाजपच्या सर्व नेत्यांना जरी चौकशीला बोलावलं तरी आम्ही जायला तयार आहोत. हि चौकशी म्हणजे पोलिसांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. फडणवीस यांनी याआधीच केंद्रीय गृहमंत्रालयाला या संबंधातील माहिती दिली होती. खरं तर फडणवीसांची चौकशी करण्याऐवजी त्यांनी जे पुरावे दिले त्याची चौकशी करायला हवी. पण उलट फडणवीसांची चौकशी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. पुढे बोलताना दानवे असेही म्हणाले, भाजपच्या सर्व नेत्यांना जरी चौकशीला बोलावलं तरी आम्ही जायला तयार आहोत. आम्ही जर चूक केली असेल तर शिक्षा भोगायलाही तयार आहोत. पण केंद्रीय यंत्रणा जो तपास करत आहेत त्यामध्ये स्वतः निर्दोष असल्याचे महविकास आघाडीतील नेत्यांनी सिद्ध केले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!