Share

“सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपात आहे”, नवाब मलिकांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकरने वाइन विक्रीस (Wine sale decision) परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे भाजपकडून जोरदार विरोध केला जात आहे. ठाकरे सरकारचा वाईनमार्फत राज्याला ‘मद्यराष्ट्र’ बनवण्याचा घाट असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. दरम्यान यावरच आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांनी ‘सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपात आहे’, असे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

“भाजप वाईन निर्णयाला विरोध करत आहे, मात्र अगोदर शिवराज सरकारने, गोवा, हिमाचल प्रदेश सरकारने असाच निर्णय घेतला होता की नाही हे भाजपने सांगावे. भाजप त्यांच्या नेत्यांचे दारू बनवण्याचे परवाने परत करणार का हा आमचा प्रश्न आहे. तसेच अनेक नेते मद्यही बनवत आहेत. अनेकांची तर मद्य विक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे सर्वाधिक दारू पिणारे लोकं हे भाजपात आहेत. (BJP has the highest number of alcoholics Criticism of Nawab Malik) त्यामुळे आजपासून दारू पिणार नाही अशी शपथ भाजप नेत्यांनी घ्यावी.” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान आजच ऑनलाईन झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटू नये असे म्हणत निर्णय मागे घेतला जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भारतात सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. याच द्राक्षांपासून पुढे वाईन बनवण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थातच याचा फायदा होतो, परंतु या वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध होत असल्यास योग्य वेळी वाईन विक्रीचा निर्णय मागे घेतल्यास आश्चर्य वाटू नये. असे शरद पवारांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!