Share

मुंबईमध्ये सध्या एकही कन्टेनमेंट झोन नाही पण धोका कायम

Published On: 

मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते.

परंतु मागील काही दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे आणि वाढलेल्या लसीकरणामुळे सध्या तरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. कोरोनाशी लढणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईमध्ये एकही कन्टेनमेंट झोन नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

आतापर्यंत अंधेरीत 2 कन्टेनमेंट झोन होते, ते देखील रद्द करण्यात आले आहेत. मुंबईतील कोरोनाचा फैलाव रोखण्यात पालिकेला यश मिळालं आहे. असे असले तरीही धोका अद्याप टळलेला नाही. काही भागात अद्यापही इमारती सील आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेणं आवश्यक आहे. मुंबई कंटेनमेंट झोन फ्री झाली असली तरी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!