Share

मुंबई महापालिकेचा गणेशोत्सव मंडळांना दिलासा !

Published On: 

मुंबई : भारतासह जगभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. २०२० सह २०२१ च्या सुरुवातीला देखील कोरोना रोगाने देशात थैमान घातल्याने हजारो लोकांना प्राण गमवावा लागला आहे. पुण्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर घातला होता. आता पुण्यातील कोरोना स्थिती आटोक्यात येत असल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि सण-उत्सव यामुळे अधिक संसर्गाची भीती वैद्यकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.

दरम्यान, गणेशोत्सवाला आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिला असून वातावरण निर्मिती देखील होत आहे. श्रावण सुरु झाल्या झाल्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. मुंबईमध्ये गणेशोत्सव बघायला देश-विदेशातून लोक येत असतात. यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने राज्य सरकारने गणेशोत्सवावर काही निर्बंध घातले असून हा उत्सव यंदा देखील साधेपणाने साजरा करावा, असं आवाहन केलं आहे.

आता मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना एक दिलासा दिला आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना व्यावसायिक जाहिराती स्वीकारण्यास अखेर महापालिकेने परवानगी दिली आहे. यामुळे मंडळांना आर्थिक दिलासा होणार असून विविध कामांसाठी हा निधी त्यांना वयोगट आणता येईल. या जाहिरातींसाठी प्रशासनाने नियमावली बनवली असून, तिचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

कोरोनामुळे मंडळांना मोठा फटका बसला होता. प्रयोजकांना देखील आर्थिक संकटाला सामोरे जावे लागल्यामुळे त्यांनी हात आखडता घेतला. अशातच, मागील वर्षी पालिकेने व्यावसायिक जाहिरातींना बंदी घातली होती. त्यामुळे उत्सवावरआर्थिक संकट निर्माण होत असल्याने व्यावसायिक आणि आरोग्य विषयक जाहिराती घेण्यास मंडळांना आडकाठी आणू नये, असा आग्रह नुकत्याच पालिकेसोबत झालेल्या बैठकीत मंडळांनी धरला होता. त्याला महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

याबाबत ११ ऑगस्ट, २०२१ रोजी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून व्यावसायिक जाहिरातींच्या परवानगीची माहिती देण्यात आली आहे. मंडपांच्या प्रवेशद्वारापासून शंभर मीटरपर्यंतच्या अंतरात जाहिराती प्रदर्शित करण्यास १०१ रुपये तसेच शंभर मीटरबाहेर प्रवेशद्वार जाहिरातीसाठी एक हजार रुपये शुल्क आकारून परवानगी दिली जाणार आहे. (फक्त एका प्रवेशद्वारावर जाहिरात करता येईल.) रस्ते, फूटपाथवर जाहिरातीसाठी मनाई करण्यात आली आहे. मंडपाच्या आतील जाहिरातीसाठी सरसकट १२५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

जाहिरातीबाबत घालण्यात आलेल्या अटी –

  • गुटखा, तंबाखू, दारू उत्पादनाची जाहिरात करता येणार नाही.
  • सिनेमा, दूरचित्रवाणी मालिकांच्या जाहिरातींमध्ये अश्लील जाहिरातींस प्रतिबंध
  • जाहिरातींमुळे पदपथावरील पादचाऱ्यांना व रस्त्यावरील वाहतुकीला कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
  • प्रवेशद्वाराच्या वरच्या आडव्या बाजूस ‘भक्तांचे हार्दिक स्वागत’ व उजव्या आणि डाव्या बाजूला व्यावसायिक जाहिराती करता येतील.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि नागरिक संदेश लावणे बंधनकारक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!