Share

‘डान्स दीवाने शो’मध्ये मीराबाई भावूक; माधुरीला भेटण्याचे स्वप्न झालं पूर्ण

Published On: 

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये वेटलिफ्टींगमध्ये मीराबाई चानुने रौप्यपदक पटकावत इतिहास घडवला. ४९ किलो गटात मीराबाई चानुने हे पदक पटकावले. यानंतर त्यांचे संपूर्ण भारतभर कौतुक करण्यात आले. नुकतेच मीराबाईने ‘डान्स दीवाने’ शोमध्ये हजेरी लावली होती आणि यावेळी मीराबाई माधुरी दीक्षितला देखील भेटल्या.

१५ ऑगस्टला भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘डान्स दीवाने शो’मध्ये ‘सलाम इंडिया’ नावाने खास एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या खास भागात मीराबाई चानूसह भारताचे माजी क्रिकेटर कपील देव तसंच मोहिंदर अमरनाथ, लाली भवानी देवी आणि प्रिया मलिक हे देखील उपस्थित आहे. या शोमध्ये मीराबाईचा खडतर प्रवास एका डान्स परफॉर्मन्समधून दाखविण्यात आले. यानंतर मीराबाई यांना अश्रू अनावर झाल्या.

https://www.instagram.com/p/CSgPaHjqNDI/?utm_source=ig_web_copy_link

यावेळी  मीराबाई म्हणाली, ‘डान्स दीवाने शो’मध्ये येऊन मला खूप छान वाटलं. मी कधी विचारही केला नव्हता की मी या शोमध्ये येईन आणि माधुरी मॅमना भेटू शकेल. मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. लहान पणापासूनच मला डान्सची आवड आहे.’ असं म्हणत मीराबाईने त्यांच्या भावांना व्यक्त केल्या आहे. काही दिवसापूर्वीच मीराबाईने बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची देखील भेट घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!