Share

भाजप नेते प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण

Published On: 

मुंबई : दिल्लीवारी करून परतलेले भाजपचे नेते आता राज्यात कामाला लागले आहे.  शुक्रवारी मुंबईत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

‘मार्मिक’ वर्धापन दिन सोहळ्यात मुख्यमंत्री तथा  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत दरेकरही उपस्थित होते. मुंबईतील सहकारी संस्थांकडून पूरग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दीड कोटीची मदत देण्यात आली. मदतनिधी देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व दरेकर यांनी केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंददार चर्चा झाली.

मुंबई महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आहेत. भाजप व शिवसेनेत या वेळी अटीतटीचा सामना होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दरेकर आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या चर्चेला महत्त्व आहे. दरेकर हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. ते मनसेत होते. सध्या प्रदेश भाजपचे सर्वेसर्वा फडणवीस यांच्या जवळचे आहेत. दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेच्या कर्जवाटप घोटाळ्याची सहकार विभाग चौकशी करत आहे. त्यामुळे दरेकर आणि ठाकरे यांच्यात याप्रकरणी चर्चा झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, ३० जुलै रोजी अतिवृष्टीमुळे महापूर आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत होते त्याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे सुद्धा पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावर होते. याच दरम्यान आजी-माजी मुख्यमंत्री हे कोल्हापुरात एकमेकांच्या समोरासमोर आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!