🕒 1 min read
Kishori Pednekar । मुंबई : भाजपचे माजी खासदार यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी आरोप केले होते. या आरोपावरून पोलिसांकडून दादर पोलिस ठाण्यात अडीच तास चौकशी करण्यात आली. चौकशी नंतर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आरोपींसोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगच्या आरोपावर सांगितले की, प्रत्येक मेसेज वाचून रिप्लाय दिला जात नाही. यासंदर्भात मी मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या, आरोप एका पक्षाच्या वरीष्ठ नेत्याने केला आहे. प्रत्येक आरोपाला उत्तर दिले पाहीजे असे नाही. पोलिसांनी जे प्रश्न विचारले त्याची मला माहीत असलेली उत्तरे दिली आहेत. मी कायद्याची लढाई लढत आहे. आरोपामध्ये 10 टक्केही सत्य नाही. साप समजून दोरी बडवण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी किरीट सोमय्यांबद्दल बोलणं टाळलं.
त्या म्हणाल्या, प्रत्येक आरोपाला उत्तर दिले पाहिजे असे नाही. कर नाही त्याला डर कशाला अशी म्हण आहे त्याप्रमाणे मी आले.आम्ही बराच वेळ बसलो होतो त्यात बराच वेळ गप्पांमध्ये वेळ गेला. जे रंगवलं जात आहे त्यातील 10 टक्केही खरे नाही. मला कोणी मेसेज केला मी तो वाचला का? ज्याने मेसेज केला त्याला उत्तर देण्यास बांधिल मी बांधील नसल्याचे ही त्या म्हणाल्या.
काय आहे SRA फ्लॅट घोटाळा?
एसआरए फ्लॅट घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांनी सांगितले की, एकूण नऊ जणांनी त्यांच्याकडे एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) मध्ये फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याच्या तक्रारी केल्या होत्या पण त्यांना काहीच मिळाले नाही. फक्त फ्लॅट मिळाला आणि पैसे परत दिले नाहीत. याप्रकरणी पोलिसांनी महापौरांच्या निकटवर्तीयालाही अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Bachhu Kadu । “गरिबाच्या पोरीनं प्रेम केलं तर ती पळाली आणि श्रीमंताच्या पोरीनं केलं तर…”; बच्चू कडूंचा शरद पवारांना खोचक टोला
- Bachchu Kadu । “…तर मी सत्तेतून बाहेर पडणार आणि राजकारण सोडणार”; बच्चू कडूंच वक्तव्य
- Winter Skin Care | हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ तेल
- Bachhu Kadu । “पहिली वेळ आहे म्हणून माफ, यापुढे काही कराल तर…” ; बच्चू कडूंचा कुणाला इशारा?
- Devoleena Bhattacharya | देवोलीनाचे हॉट डान्स मुव्ह बघून, चाहत्यांचे उडाले होश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
