मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा डाव गडगडला. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजानी जोरदार पुनरागमन करत भारतीय संघाला पहिल्या डावात ३६४ धावांवर रोखले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात ३ गडी गमावून ११९ धावांची मजल मारली होती. भारतीय संघ अद्यापही २४५ धावांनी आघाडीवर आहे.
या सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा कर्णधार जो रुट ४८ धावांवर खेळत होता. या खेळीदरम्यान जो रुटने भारत आणि इंग्लंड संघादरम्यान २००० धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा ओलांडताना जो रुटने भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला मागे टाकले. अशी कामगीरी करणारा तो इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला.
भारत आणि इंग्लंड दोन्ही संघादरम्यान सर्वाधीक धावांच्या बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. सचिनने दोन्ही देशादरम्यान झालेल्या सामन्यात २५३५ धावां केल्या आहे. यानंतर दुसऱ्या स्थानी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर असुन त्यांनी २४८३ इतक्या धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अलिस्टर कुक असुन त्यांने २४३१ धावा केल्या आहेत. आता चौथ्या स्थानी जो रुट पोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संसदीय मर्यादाभंग! खासदार बेफाम का होतात, याची कारणे अष्टप्रधानांनी शोधावी- संजय राऊत
- परदेशी भूमीवर रिषभचा चमत्कार ; कमी वेळातच तोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम
- ट्रक चोरी प्रकरणी आरोपींना दोनदिवसांची पोलीस कोठडी
- आता जाहीर सभांमधून शरद पवारांचे व्हिडीओ लागणार बहुधा – अतुल भातखळकर
- औरंगाबादेत शिवसेना, भाजप, काँग्रेस मनपा निवडणूकीच्या तयारीत व्यस्त; तर ‘राष्ट्रवादी’ अजूनही सुस्तच!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

