Share

Sandip Deshpande | “मग पैसे खाताना तुम्ही …”; SRA घोटाळ्यावरून संदीप देशपांडेंची पेडणेकरांवर टीका

Published On: 

Sandip Deshpande | मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर गंभीर आरोप केले. पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएमधील ६ गाळे हस्तगत केल्याचं सोमय्या म्हणाले. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी आज प्रकार परिषद घेत चिमदास विठ्ठलदास पत्राचाळ येथेही आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत या घोटाळ्यातील आरोपी आणि किशोरी पेडणेकर यांचे काय संबंध आहेत, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशीही करण्यात आली. आता अजून एका आर्थिक घोटाळ्यात पेडणेकरांचं नाव घेतलं जात आहे.

यादव नगर चिमदास विठ्ठलदास पत्राचाळ शंकर नगर नरमपथ मार्ग येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि किशोरी पेडणेकर यांचे काय संबंध आहेत याचा तपास व्हायला हवा अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे. आज तुम्ही म्हणता की तुम्ही महिला आहे. मग पैसे खाताना तुम्ही महिला आहे, हे तुम्हाला माहिती नव्हतं का? असा सवाल करत पेडणेकरांनी सहानुभूतीचे राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, या ठिकाणी १९५ क्रमांकाच्या भूखंडावर केवळ ६३ झोपड्या होत्या. त्यानंतर वसाहत अधिकारी आणि या योजनेचे मुख्य प्रवर्तक असलेले शिवसेनेचे पदाधिकारी बेलेकर यांच्यासह आणखी काही राजकीय नेत्यांनी मिळून या ६३ झोपड्यांच्या जागी २२१ झोपड्यांची नोंद केली. त्यानंतर वाढवण्यात आलेल्या झोपड्या विकून त्यातून पैसे गोळा करण्यात आले. यातील एक झोपडपट्टी एसआरए घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले वसाहत अधिकारी चंदू चव्हाण यांच्या नावावर आहे. तसेच त्यांनी खोटे प्रतिज्ञापत्रही दाखल केलं असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

याचबरोबर ज्याचे दादरमध्ये मोठे हॉटेल आहे, त्यांच्या नावावरही येथे झोपडपट्टीची नोंद आहे, अशाप्रकारे इतर ठिकाणीही आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे, असा आरोप संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी केला आहे. “हा सर्व प्रकार जेव्हा घडला त्यावेळी त्या भागाच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर होत्या. त्यामुळे ज्या वसाहत अधिकाऱ्याला अटक करण्यात आली, त्याच्या पाठिशी कोणाचा हात होता? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यायला हवे.”, असं संदीप देशपांडे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!