Share

Kirit Somaiya । एसआरए घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पेडणेकरांना आव्हान; म्हणाले, “संजय अंधारी नावाच्या माणसाला…”

Published On: 

🕒 1 min read

Kirit Somaiya । मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएमधील ६ गाळे हस्तगत केल्याचं सोमय्या म्हणाले आहेत. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर  यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेले आरोप साफ फेटाळून लावले. शिवाय दादर पोलीस स्थानकात चौकशीला मी जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरए येथील सदनिका हस्तगत करण्यासाठी सुनिल कदम नावाच्या व्यक्तीला संजय अंधारी असल्याचे दाखवून सदनिका हस्तगत केल्याचा आरोप केला आहे. तसेच संजय अंधारी नावाच्या माणसाला पेडणेकर यांनी हजर करावे, असे खुले आव्हानही सोमय्या यांनी पेडणेकरांना दिले आहे.

पुढे ते म्हणाले, किशोरी पेडणेकर तसेच बेनामी गाळे हस्तगत करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना झोपडपट्टी विकास प्राधिकरणाने नोटीस पाठवलेली आहे. त्यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरए येथील सदनिका बेनामी पद्धतीने ताब्यात घेतलेल्या आहेत. वर्षानुर्षे या सदनिका त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळेच ही नोटीस पाठवण्यात आली. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी माझ्या तक्रारी दाबल्या असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

त्याचबरोबर किशोरी पेडणेकर गोमाता जनता नगरात कुलूप घेऊन गेल्या होत्या. अशी नौटंकी करू नये. २०१७ सालच्या निवडणुकीमध्ये पेडणेकर यांनी आपल्या शपथपत्रात या गाळ्याचा पत्ता दिला होता. त्यानंतर मी आता गेल्यानंतरही त्यांच्याच ताब्यात हे गाळे असल्याचे मला समजले असा दावा सोमय्या यांनी केलाय.

“एसआरएने ज्या लोकांना नोटिशी पाठवलेल्या आहेत, ती माणसे कोठे आहेत, हे फक्त पेडणेकर यांनाच माहिती आहे. एसआरएच्या सदनिका पेडणेकर यांच्या किस कार्पोरेट सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आल्याचे या नोटिशीत सांगण्यात आले असून त्याबाबत एसआरएने या लोकांना जाब विचारलेला आहे. त्यामुळे पेडणेकर यांना मला विचारयचे आहे की, तुम्ही संजय अंधारी यांच्याकडून जागा घेतली. हा संजय अंधारी नावाचा माणूस खरंच आहे का? मी किशोरी पेडणेकर तसेच उद्धव ठाकरे यांना आव्हान करतो की त्यांनी संजय अंधारी नावाच्या माणसाला हजर करावे”, असंही सोमय्या म्हणाले.

मात्र हे दबावतंत्र असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.  कसंही करुन मला अडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. त्या म्हणाल्या, दवाबतंत्राचा वापर केला जात आहे. तुमच्याकडे केंद्रात सत्ता आहे. राज्यात सत्ता आहे. सत्ता असली म्हणून काहीही करायचं का? असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे.

दरम्यान, यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एसआरएमध्ये फ्लॅट मिळवण्यासाठी आपल्याकडून पैसे घेतल्याची तक्रार नऊजणांनी केली आहे. पण लाच देऊनही त्यांना फ्लॅट मिळालेले नाहीत. या नऊजणांकडून मिळालेल्या रकमेचा वाटा पेडणेकरांना देण्यात आल्याचा आरोप आहे. त्याच अनुषंगानं त्यांची पहिल्यांदा चौकशी करण्यात आली होती. या संदर्भात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!