पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टीचे आमदार भाजप आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांचे भाऊ शंकर जगताप (Shankar Jagtap) यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयावर अज्ञातांनी मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी पेट्रोल बॉम्ब फेकला. पेट्रोल बॉम्ब फेकल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले आहेत. ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र या घटनेचे नेमेकं कारण समोर आले आहे.
या घटनेची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला. या हल्ल्याप्रकरणी 23 वर्षीय प्रद्युम्न भोसले याला अटक करण्यात आली आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केलं असल्याचे समोर आले. मात्र या हल्ल्यामागचं कारण ऐकून सर्वच चकित झाले.प्रद्युम्न याचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस झाला. वाढदिवसाच्या दिवशी तो केक कापण्यासाठी आपल्या मित्रांसोबत शंकर जगताप यांच्या कार्यालयात गेला होता.
शंकर जगताप यांनी केक कापावा अशी त्याची इच्छा होती. मात्र, ते केक न कापताच निघून गेल्याने प्रद्युम्न संतापला आणि त्याने रागाच्या भरात शंकर जगताप यांच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकून पळ काढला. दरम्यान, प्रद्युम्न भोसले याच्यासोबत या कृत्यात सहभागी असलेल्या त्याच्या इतर मित्रांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; ‘या’ खेळाडूकडे असणार कर्णधारपद
- इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सात्त्विक-चिराग यांची विजयी घोडदौड
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर
- टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भयभीत होता; इंझमामचे बेधडक वक्तव्य
- ‘भारत हा सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश असून पाश्चात्य माध्यमांना भारताची प्रगती बघवत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

