मुंबई: टी-२० र्ल्डकप २०२१ स्पर्धेमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने(virat kohali) नाणेफेक गमावली आणि संघाला १० गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने (inzamam ul haq)यावरच आपली बेधडक प्रतिक्रिया दिली आहे. टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानकडून पराभूत झाला, कारण नाणेफेकीपूर्वी त्यांच्या खेळाडूंवर दबाव होता, असे वक्तव्य इंझमामने केले आहे.
इंझमामने म्हटले आहे की, जेव्हा मी नाणेफेक दरम्यान विराट कोहली आणि बाबर आझमला पाहिले तेव्हा हे स्पष्ट झाले की भारतीयांवर खूप दबाव आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने बाद करण्यापूर्वीच भारतावर दबाव होता.कारण ते भयभीत होते.सामन्यापूर्वीच ते दडपणाखाली होते आणि त्यामुळेच त्यांचा १० विकेट्सने पराभव झाला. तुम्ही त्याचे शारीरिक हावभाव पाहू शकता. ते भयभीत दिसत होते, तर पाकिस्तानचे खेळाडू सामना जिंकण्यासाठी अधिक आत्मविश्वास आणि उत्साही होते.
भारत सुरुवातीपासूनच विजेतेपदाचा दावेदार होता, पण खूप दबावामुळे त्यांना विजय मिळाला नाही. भारतीय संघ कधीही टी-२० विश्वचषकात आपल्या खेळाडूंप्रमाणे खेळत नाही. ते एक चांगले टी-२० संघ आहेत यात शंका नाही. गेल्या २-३ वर्षातील त्यांची कामगिरी पाहिली तर खरोखरच खूप छान प्रवास झाला असे विधान इंझमाम-उल-हक यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- ‘त्यांच्या’ एका फोनमुळे मला माघार घ्यावी लागली; अमल महाडिकांची खंत
- औरंगाबादेत एसटी संपकरी ठाम; रुजु होण्यासाठी महामंडळाकडून ‘अल्टिमेटम’!
- नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल परबांचे सडेतोड उत्तर
- कपिल देव यांनी साधला हार्दिकवर निशाणा; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

